एरंडोल |प्रतिनिधी
एरंडोल :- येथे परीट धोबी समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला याप्रसंगी सभा मंडपाचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.संत गाडगे महाराज यांच्या जन्मदिवस असल्यामुळे आ चिमणराव पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला व प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्यास उजाळा दिला. आमदार चिमणराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा मंत्र जो समाजाला दिला त्याच प्रमाणे आपण सर्वांनी तो मंत्र लक्षात ठेवूनआपला परिसर व गाव स्वच्छ ठेवले पाहिजे. असे सागितले.यावेळी परीट धोबी समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी यांनी आ चिमणराव पाटील व मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या कडे सभामंडपा समोरील ओपन जागेत चेकर बसविणे व शौचालय याची मागणी केली.

याप्रसंगी मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, बाळा पाटील, बबलू चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,आनंदा चौधरी, आनंद दाभाडे, जगदिश ठाकूर, विशाल सोनार, राजू साळी, योगेश वाघ प्रदीप सूर्यवंशी श्याम जाधव नितीन तेलंगे

सोमनाथ माने जयवंत वाघ, जगदीश ठाकुर, रामभाऊ गांगुर्डे, डॉ. प्रशांत पाटील,राज पाटील, समाधान शिरसाळे सोमनाथ महाले किरण निकुंभ अजय महाले रवी निंबाळकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर निंबाळकर यांनी केले सूत्रसंचालन किशोर मोराणकर यांनी केले आभार प्रदर्शनयोगेश वाघ व प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






