Viral Video: भररस्त्यात बाईकवरुन जाताना जोडप्याला किस करण्याचा मोह आवरला नाही, पाहून नेटकरीही भडकले

Spread the love

Viral Video:- बाईकवर किंवा स्कूटीवर फिल्मी स्टाईलमध्ये रोमान्स करणाऱ्या तरुण-तरुणींचे अनेक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहेत. नुकताच बंगळुरूमधील अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.तर आता त्याचीच पुनरावृत्ती उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही झाल्याचं पाहायला मिळत आहे. येथील एका जोडपे बाईकवरुव जाताना भर रस्त्यावर रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या या जोडीला पाहून अनेकांनाआश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण धावत्या बाईकवर असले कृत्य करणं धोकादायक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे त्या दोघांचा शोध सुरू केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

सीतापूर रोडचा व्हिडिओ–
बाईकवर रोमान्स करत असलेल्या या जोडप्याचा व्हिडिओ एका कारमधील व्यक्तीने शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ हरदोई येथील सीतापूर रोडवरील इटौली गावाजवळचा असून तो मंगळवारी सकाळीच शूट करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे.

नेमकं काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसवलं आहे. मुलगा खूप वेगाने बाईक चालवत आहे, तर मुलगी एका बाजूला पाय सोडून बसल्याचं दिसत आहे. ती आपला चेहरा मुलाच्या चेहऱ्याकडे सहज जाईल अशा पद्धतीने बसल्याचंही दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही बाईकवर एकमेकांना किस करत आहेत. सोशल मीडियावर लोकांनी या दोघांवर खूप टीका करत त्याला अश्लील असल्याचंही म्हटलं आहे.

पोलिसांकडून प्रेमी युगुलाचा शोध सुरु –
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रेमी युगुलाचा शोध सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बाइकच्या नंबरवरून दोघांचा शोध सुरु केला असून ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार