निंभोरा प्रतिनिधी
रावेर :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे रावेर तालुक्यातील मांगलवाडी येथे दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजेपूर्वी मयत विनोद सुभान कांडेले वय (३५)वर्षे यांचा मृतदेह मांगलवाडी गावाजवळ असलेल्या खोरीच्या बाजूला काट्यांमध्ये हा नग्नवस्थेत मृत आढळून आला.
या बाबत मांगलवाडी येथील रहिवाशी अमोल सूर्यभान ठाकरे वय (२१) यांनी खबर दिल्याने निंभोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून रावेर ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून निंभोरा पो.स्टे. ला गु.र.
४/२०२३ सीआरपीसी.कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना ईश्वर चव्हाण,पो.ना गणेश सुर्यवंशी हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






