धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व वर्णन करण्यात आले.
शाळेतील शिक्षक सागर गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो याबाबत सविस्तर माहिती दिली.विज्ञान व विज्ञानाच्या ज्ञान शाखा यामध्ये जीवशास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र याबद्दल विश्लेषण केले. विज्ञानाची सृष्टी आपण स्विकारली खरी परंतु विज्ञानाची दृष्टी आपण स्विकारली पाहिजे असे मत गायकवाड सरांनी व्यक्त केले. तद्नंतर सामान्य ज्ञानाची प्रश्नमंजुषा घेऊन योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना शिक्षकवर्गाच्या हस्ते लेखणी (पेन) भेट स्वरूप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






