गौरवकुमार पाटील / अमळनेर
तालुक्यातील पाडळसरे येथील हात मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या गर्भवती जागृती अनिल कोळी वय २२ यांना प्रसवकळा सुरू होताच दिनांक २७ रोजी दुपारी मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले ,तेथून डॉक्टरांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्यावर आज दिनांक २८ रोजी दुपारी ४ वाजता जागृतीची प्रसूती करण्यात आली मात्र जन्माला आलेले स्त्री जातीचे बाळ दगावले व जागृतीला प्रसूती नंतर रक्तस्राव सुरू झाल्याने तिला धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते ,
मात्र धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा रक्तस्राव अति झाल्याने तेथे मृत्यू झाल्याने जन्माला आलेले बाळ व जागृतीच्या मृत्यूची वार्ता गावाला आल्याने एकच शोककळा पसरली , स्वतः मजुरी करत इतरांना ही रोजगार उपलब्ध करून सामूहिक गटाने संचालन करणारा अनिल तुकाराम कोळी व त्याचा दिमतीला हात मजुरी करून हातभार लावणारी जागृती ही काल पर्यंत तिने कष्ट घेत सुखी संसार करणारे दाम्पत्य म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख गावात निर्माण केली होती ,

अल्पशा आजाराने आईवडील गमावलेल्या अनिल कोळीच्या संसार थाटण्यासाठी बाम्भोरी ता धरणगाव येथील माहेर असलेल्या जागृतीने अनिल कोळी यांचाशी दोन वर्षांपूर्वी विवाह करून मजुरीवर तीन दुभत्या गायी घेऊन दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून घरी आल्यावर गायींना चारा आणून दुधाचा जोड व्यवसाय सुरू केला होता , दोनच वर्षात जागृतीने अनिल कोळीचा संसार फुलवून वेल बहरत असतानाच बाळाचा जन्म होताच बाळ दगावले व जागृतीचाही अति रक्तस्राव होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने

गाव हळहळले , गावात एकाही घरात चूल पेटली नाही , मृत जागृतीचे दिनांक १ मार्च रोजी धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह ताब्यात मिळाल्यावर गावी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत , मृत जागृतीच्या पश्चात पती , चुलत सासरे व दोन नणंद असा परिवार आहे , धुळे शहर पोलीस ठाण्यात अनिल कोळीचा फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






