स्वच्छता सर्वेक्षण अभियान 2022 अंतर्गत महापालिकेतर्फे रात्रपाळी स्वच्छता मोहिमेचा महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रारंभ.

Spread the love

दररोज दिवसभरातील डस्टबिनमध्ये साठवलेला कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन

जळगाव, ता. 2: स्वच्छता सर्वेक्षण अभियान 2022 अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे रात्रपाळी स्वच्छता अभियानाचा काल मंगळवार,दि.1 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री शहरातील महात्मा फुले मार्केटमधील तळमजल्यात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत प्रारंभ केला.

यावेळी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी सांगितले, की महापालिकेच्या मालकीच्या शहरातील विविध मार्केटमधील स्वच्छता आता दररोज केली जाणार आहे. त्यासाठी त्या-त्या मार्केटमधील व्यापारी, दुकानदारांनी आपली स्वतंत्रपणे डस्टबिन घेऊन दिवसभरातील कचरा त्यात टाकावा. त्यानंतर महापालिकेतर्फे रोज सायंकाळी 7.30 ते रात्री 8 दरम्यान शहरातील प्रत्येक मार्केटजवळ घंटागाडी येईल तेव्हा संबंधित डस्टबिनमधील तसेच आपापल्या दुकानाच्या आजूबाजूला पडलेला कचरा त्यात आवर्जून टाकावा.

कुणीही कचरा घंटागाडीत न टाकता इतरत्र टाकल्याचे आढळल्यास संबंधितांवर महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यावर महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत करीत आपण केलेल्या या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल, अशी ग्वाही उपस्थित व्यापारी, दुकानदारांनी यावेळी त्यांना दिली.

महापालिका उपायुक्त श्री.श्याम गोसावी, आरोग्य निरीक्षक श्री.रमेश कांबळे, श्री.एस.बी. बडगुजर, वॉटरग्रेसचे व्यवस्थापक श्री.नितीन जगताप तसेच महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी व हॉकर्स यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम झुंजार