सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधार्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यानंतर संजय राऊतांवरील हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आहे.
चोरमंडळावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला. या सभागृहाला चोर म्हणायचं….४१ चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेमध्ये जायचं. या चोरांनी त्याला मतं दिली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. मार्मिकमधूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आक्षेपार्ह चित्र काढतात. कोणालाही डिवचायचा संजय राऊतांनी ठेका घेतलाय का?, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
पहा व्हिडिओ :
आम्ही जनतेच्या मतांवर या सभागृहात निवडून आलोय. तुमच्यासारखे मागच्या दरवाजाने निवडून आलो नाहीय. शिवसेनेची यांनी तर वाट लावली आणि ते आता १६ आमदारांची देखील वाट लावणार आहेत. ज्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उल्लू बनवलं. ३५-३५ वर्षे तपस्या करणार्या लोकांना घरातून बाहेर काढलं. या माणसाने शिवसेनेचा सर्व सत्यानाश केला, तो माणूस आज आम्हाला चोर म्हणतोय. सभागृहाला चोर म्हणतोय. तुम्ही आमची मतं घेतलीय. तुम्हाला जर येवढी गणिमा राखायची असेल तर आता खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






