निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथे वै.ह.भ.प. विठ्ठल सिताराम पाटील निंभोरा यांच्या पुण्यस्मरणार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय किर्तनकार समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भुषण ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा भव्य किर्तन सोहळा दिनांक ११/०३/२०२३ शनिवार रात्री ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
विशेष उपस्थिती म्हणुन प.पु. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज (सतपंथ मंदिर फैजपूर) ह.भ.प.शारंगधर महाराज ( यज्ञेश्वर आश्रम मेहुण) श्रीमती रक्षाताई खडसे (खासदार रावेर) मा. श्री. एकनाथरावजी खडसे (मा. महसूल मंत्री) मा. श्री. शिरीष मधुकरराव चौधरी (आमदार रावेर) सौ. रोहिणीताई खडसे (खेवलकर) अध्यक्षा जळगाव जिल्हा सह. बँक लि. जळगाव राहणार आहे.
तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शन
ह.भ.प. श्री. धनराज महाराज, अंजाळे ह.भ.प. श्री. नारायण महाराज, भामलवाडी ह.भ.प. श्री. दुर्गादास महाराज, खिर्डी ह.भ.प. श्री. नारायण महाराज, निंभोरा ह.भ.प. श्री. संजय महाराज, बाम्हंदे हे करत असुन या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प.श्री. गजानन विठ्ठल पाटील चि. तोषल गजानन पाटील यांनी केले आहे.
कीर्तनाचा कार्यक्रम
संभाजी नगर स्वामी समर्थ केंद्रा जवळ स्टेशन रोड निंभोरा ता. रावेर जि. जळगाव येथे हा किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला युवा रसिक मंडळ व समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्त,भजनी मंडळ,निंभोरा हे सहकार्य करत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






