पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात बारावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजदत्ता नरेंद्र पवार (वय १८) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. बारावीच्या परिक्षा सुरु असल्याने राजदत्ताने त्याच्या मित्राला फोन करुन अभ्यास करण्यासाठी त्याच्या घरी बोलावले होते. मात्र मित्र पोहोचण्यापूर्वी राजदत्ता याने जगाचा निरोप घेतला होता. राजदत्ताला मृतावस्थेत पाहून मित्र सुन्न झाला होता.
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील साईनगरात राजदत्ता नरेंद्र पवार हा कुटुंबासह वास्तव्यास होता. राजदत्ता हा सोयगाव तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होता. सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असून २७ रोजी राजदत्ताने फिजिक्सचा पेपर दिला होता. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता घरीच होता. तर त्याची सावत्र आई माहेरच्या मंडळींसोबत रामेश्वर येथे देव दर्शनाला गेली आहे. त्यामुळे राजदत्ता घरी एकटाच होता.
सायंकाळी ५ वाजता राजदत्ताने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ताचा मित्र ५ च्या सुमारास राजदत्ताच्या घरी पोहोचला. त्यावेळी राजदत्ता घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी राजदत्ता घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी मित्रांनी एकच आक्रोश केला. राजदत्ताला पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास खरे करत आहेत.
पवार कुटुंबाचा वंशाचा दिवा विझला :
राजदत्ता लहान असताना त्याच्या आईचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे दरम्यानच्या काळात राजदत्ताचे वडील नरेंद्र पवार यांनी दुसरे लग्न केले. सर्व काही सुरळीत सुरु असताना नियतीने डाव साधला. नरेंद्र पवार यांना यकृताचा आजार झाला. त्यामुळे त्यांचे निधन झाले. राजदत्ता हा पवार कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी असून त्यातील एका बहिणीचे लग्न झाले आहे, तर दुसरी बहिण नाशिक येथे शिक्षण घेत आहे.
आई वडील नसल्याने संपूर्ण जबाबदारी राजदत्ताच्या खांद्यावर आली होती. उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी मिळावी ही जिद्द उराशी बाळगून राजदत्ता शिक्षण घेत होता. नाशिक येथे खाजगी क्लासेस लावून तो बारावीची परीक्षा देत होता. राजदत्ताच्या मृत्यूने पवार कुटुंबियांचा वंशाचा दिवा विझला असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हे वाचलंत का ?
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.
- अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध,प्रेयसी लग्नासाठी पळून आली प्रियकराकडे, पण त्याने दिला धोका अन्…. एक SMS अन् 6 महिन्यांनी अंगावर काटा आणणारी कहाणी.
- धरणगाव तालुक्यात बाबाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू,सर्व नातेवाईक जमले,अचानक ‘तेच वृद्ध’ घरी परतल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकही थक्क.
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.