युवासेना उपजिल्हाप्रमुख व वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण चे – राहुल चव्हाण यांनी नगरपालिकेस दिले निवेदन.
जामनेर :- दिनांक-3 मार्च 2023 रोजी जामनेर शहरातील जळगाव रोड वरील ‘शिवाजी नगर’ भागाचे नाव “राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर” हे करण्यात आलेले आहे.परंतु अध्याप ही दुरुस्ती झालेल्या नामकरणाचे फलक (बोर्ड) त्या ठिकाणी लावलेले नाही. नगरपालिका सांगण्यानुसार त्यांनी 28-11-2022 रोजी ठराव पास केलेला होता.पण “इतका वेळ कुठं पाणी मुरलं कळलं नाही.
त्यानंतर 07-02-2023 रोजी “वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण” च्या माध्यमातून नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले. ते निवेदन दिल्यामुळे नगरपरिषद मार्फत 15 फेब्रुवारी रोजी तो ‘ठराव प्रसिद्ध’ करण्यात आला.
यामुळे 19 फेब्रुवारी रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या निमित्ताने हे फलक अनावरण करण्यात येईल.परंतु अध्यापही ते “फलक अनावरण” झालेले नाही.

त्यामुळे युवासेना उपजिल्हाप्रमुख व वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण चे राहुल चव्हाण यांनी 8 दिवसाचा वेळ हा नगरपरिषद,तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेला आहे. 8 दिवसांत नामकरणाचा फलक (बोर्ड) या ठिकाणी नाही लागला.तर जामनेर नगरपालिका कडे निधी उपलब्ध नाही त्यांच्याकडील निधी संपलेला आहे व इतकं छोटं आणि अत्यंत महत्वाचे काम अनेक दिवसापासून ठरवून प्रलंबित आहे.

असं समजून आम्ही सर्व “शिवप्रेमी व शिवभक्तांच्या सहकार्यातून शहरात देणगी मागून हे नामकरण फलक” (बोर्ड) या ठिकाणी उभं केल्याशिवाय शांत बसणार नाही,असा इशारा “वंदन मातृभूमी प्रतिष्ठाण” चे राहुल भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे……
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






