जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मानसिक व्यग्रता जाणवेल. ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका. काही वेळेस शांत राहणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात ठेवा. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ :-
घरगुती कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल.
मिथुन :-
कामे मनाजोगी पार पडतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल. दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल.
कर्क :-
आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कामात चंचलता आड आणू नये. वरिष्ठांचा शब्द मानावा लागेल. मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका.
सिंह :-
सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.
कन्या :-
भागीदारीतून चांगला लाभ होईल. काही नवीन गोष्टींचा अवलंब करावा. संपर्कातील लोकांकडून फायदा होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पारंपरिक कामात लक्ष घालावे.
तूळ :-
प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे. वाहन विषयक कामे निघतील. आरोग्यात सुधारणा होईल.
वृश्चिक :-
कामाचा विस्तार वाढवावा. जवळच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. दिवस खेळीमेळीत जाईल.
धनू :-
प्रवासात सावध राहावे. नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसताना पैसे खर्च करू नका. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.
मकर :-
पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. उगाचच चिडचिड करू नये.
कुंभ :-
जास्त खोलात जाऊन चौकशी कराल. आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. काही गोष्टीत धूर्तपणे वागावे लागेल. योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.
मीन :-
चंचलतेवर मात करावी. मुलांचा हट्ट पुरवाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






