एरंडोल- मतदार संघात विकासकामांची सुरु असलेली घौडदौड पाहून विरोधक हतबल झाले असून, विरोधकांच्या टीकेला विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तथा पारोळा बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांनी केले.तालुक्यातील सुमारे चौदा कोटी रुपये खर्चाच्या पूल बांधकाम,रस्ते,तलाठी कार्यालय यासह विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अमोल पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अमोलदादा पाटील यांनी एरंडोल आणि पारोळा या दोन शहरासह मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासाबाबत योग्य ते नियोजन करण्यात आले असून दोन वर्षात मतदारसंघाचे रूप बदलणार असल्याचा दावा केला.मतदारसंघातील वेगाने सुरु असलेली विकासकामे पाहून हतबल झालेले विरोधक खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.विरोधकांच्या टीकेला विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे सांगितले.आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघातील सर्व गावांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळे आगामी काळात मतदार संघातील विकासकामांची घौडदौड यापेक्षा जास्त वेगाने सुरु राहणार असल्याचे सांगितले.एरंडोल आणि पारोळा शहरातील विविध कामांमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला.यावेळी अमोल पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चार कोटी रुपये खर्चाच्या सोनबर्डी ते हणमंतखेडा या गावांना जोडणा-या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच ताडे ते एरंडोल या रस्त्याची दुरुस्तीसह मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.तालुक्यातील २१ तलाठी कार्यालय व सहा मंडळ अधिकारी कार्यालयांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, शहरसंघटक कृष्णा ओतारी,मयूर महाजन, कासोद्याचे माजी सरपंच सुदाम राक्षे, पी.आर.वाणी, शिवाजी पाटील, प्रवाराज पाटील,गोविंदा बिर्ला,ताड्याचे सरपंच देविदास पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, नागेश पाटील, शांताराम पाटील,धर्मराज पाटील, भातखेड्याचे सरपंच रावसाहेब पाटील,मनोहर पाटील, गालापुरचे सरपंच विनोद महाजन,मेघराज सैंदाणे यांचेसह पदाधिकारी,तलाठी संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






