प्रतिनिधी l पारोळा
आपलं संघटन जितकं मजबूत होईल तितकं यश आपण खेचून आणू. समोर कितीही मोठ आव्हान असले तरी यश आपल्याला मिळेलच. कारण आपण मुळापासून सक्षम आणि मजबूत झालेलो असतो. म्हणून मरगळ झटकून कामाला लागा. आपण आत्मविश्वासाने सामोरे गेलो तर लाचारी कार्यकर्तेच्या जवळही येऊ शकत नाही. म्हणून पक्ष निष्ठा व कार्य तत्परता हे कार्यकर्त्यासाठी आवश्यक आहे
येणाऱ्या बाजार समिती पंचायत समिती व नगरपरिषदा या निवडणुका मग आपल्याला जड जाणार नाहीत. असे मार्गदर्शन मा. खासदार ए. टी. पाटील यांनी बूथ सशक्तीकरण आढावा बैठकीत केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील होते. कार्यकर्त्याने कधीही नकारात्मक भूमिका न घेता आपल्या पक्षाप्रती सकारात्मक भूमिका घेतल्यास यश निश्चित मिळते.

आणि विरोधकांना आपला कमजोर मुद्दा मिळत नाही. आपोआप ते अपयशी ठरतात. पारोळा मतदारसंघात माजी खासदार ए. टी. पाटील यांच्यासारखे बलाढ्य नेतृत्व आहे .त्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचून काम करत रहा असे मार्गदर्शन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांनी केले. बैठकीला आतुल मोरे, रेखाताई चौधरी सह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
