धरणगाव तालुक्यात वादळ वाऱ्याने पिकांचे नुकसान, बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने पळविला

Spread the love

धरणगाव…तालुक्यात दिनाक ६ मार्च रोजी संध्याकाळी तुरडक पावसाच्या सरी पडल्या. मात्र प्रचंड वादळ वाऱ्याने परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे धरणगाव शिवारात एका शेतात नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले मात्र जवळ पास कुणी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, अंजनी परिसरातील हिंगोणे,पिंप्री कल्याने खुर्द ,कल्याणे होळ , भोद परिसरात मका ,गहू पिके वादळ वाऱ्यामुळे जमीन दोस्त झालेली आहेत. कल्याण खुर्द येथील पंढरीनाथ बोरसे यांच्या दोन एकर शेतातील मका जमीन दोस्त झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले

आहे.या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व तातडीने आर्थिक साह्य करावे अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी करीत आहेत.याबाबत शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता उद्या दिनाक ८ रोजी शेतात पीक पाहणी व पंचनामे करण्यासाठी येणार असल्याचे समजते अवकाळी पाऊस ,वादळ वाऱ्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत आधीच शेत मालाला भाव नाही,कांद्याचे वांधे होत आहेत ,योग्य भाव नसल्याने कापूस घरात पडून आहे ,आता मका, गहू,हरबरा पिकाचे नुकसान झाले आहे अशा परिस्थितI कसे जीवन जगावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

आस्मानी आणि सुलतानी ( बाजार पेठेत उत्पादनाला भाव नाही) आपत्तीने ग्रासले गेल्याचा भावना शेतकरी व्यक्त करतात मार्च महिन्यात शेती साठी घेतलेले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज भरावे लागते अशा परिस्थिती कर्ज कसे भरणार, या कर्जाला देखील मुदतवाढ मिळावी अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेलेला आहे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालून तातडीने तहसिलदार व संबंधित अधिकाऱ्यांना पंचाणाम्याचे आदेश देवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी देखील
राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांनी केली आहे.

हे देखील वाचा


टीम झुंजार