प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर :- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर)
येथील मच्छिमार कृष्णा बाळासाहेब रजपूत यांना भीमा नदी पात्रात मासेमारी करताना तब्बल 30 किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा सापडला. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मासळी बाजारात या माशाची दत्तात्रय व्यवहारे यांच्या तेजश्री फिश मार्केटमध्ये लिलाव पध्दतीने विक्री करण्यात आली. १८० रुपये किलो दराने याची विक्री झाली. साडेपाच हजार रुपये उत्पन्न यातून मच्छीमाराला मिळाले आहे.
कृष्णा बाळासाहेब रजपूत हे गेली पाच ते सात वर्षांपासून मच्छीमारी व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी ते मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यासाठी गेले. त्यावेळी सोमवारी त्या जाळ्यात त्यांना तब्बल ३० किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा मिळून आला. मासेमारी करत असल्यापासून पहिल्यांदाच एवढा मोठा मासा मिळाल्याचे त्याने सांगितले.

हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






