Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारे देखील असतात. प्राणीसंग्रहालयात भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.येथील प्राण्यांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना येथे आलेल्या व्यक्तींना दिल्या जातात.
तरी देखील अनेक व्यक्ती आपल्यातील खोडकरपणा थांबवत नाहीत आणि प्राण्यांना त्रास देतात. सिंहाबरोबर मस्ती करतानाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Lion Viral Video)
सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्यामुळे त्याच्या ताकतीसमोर सर्वच फिके आहेत. मात्र तरी देखील अनेक जण प्राणीसंग्रहालयात गेल्यावर पिंजऱ्यात असलेल्या सिंहाची खोड काढतात. त्याला डिवचतात आणि त्रास देतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असाच सिंहाला त्रास देत असतो. मात्र जंगलाचा राजा माणसाची मस्ती चांगलीच जिरवतो.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्राणीसंग्रहालयात काही व्यक्ती एकत्र फिरण्यासाठी आले आहेत.

ते पिंजऱ्यात असलेल्या सिंहाला पाहतात. यावेळी काही व्यक्ती सिंहाचा फोटो काढतात. तर यातील एक महानग पिंजऱ्यात आपल्या हाताची बोटं टाकून सिंहाला त्रास देतो. माणसाच्या अशा वागण्याने सिंहाला राग येतो. त्यामुळे सिंह आधी दोन ते तीन वेळा मोठ्याने गर्जना करतो. मात्र तरी देखील तो व्यक्ती सिंहाच्या जबड्यावर हात फिरवतच असतो.माणसाचं हे कृत्य पाहून सिंह त्याच्यावर हल्ला करतो. तो पटकन त्याची बोटं आपल्या जबड्यात पकडतो.

त्याला पाहून तिथे असलेल्या व्यक्ती देखील भयभीत होतात. तितक्यात काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत आणखी एक भयानक घटना घडते. माणूस सिंहाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा खूप प्रयत्न करतो. तो आपली बोटं मागे खेचतो. तितक्यात त्या माणसाची बोटं तुटून खाली पडतात. या घटनेचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतं आहे. नेटकरी माणसाच्या या कृत्यावर हसत आहेत. तर काही जण त्याच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






