निंभोरा पोलिसांतर्फे वडगाव ता.रावेर येथील बचत गट महिलांना पापड मशीन भेट

Spread the love

निंभोरा : प्रतिनिधी परमानंद शेलोडे

रावेर :- येथून जवळच असलेल्या वडगाव ता.रावेर येथे जागतिक महिला दिना निमित्त निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे वडगाव येथील पंचशीला महिला स्वयंरोजगार बचत गटास पापड मशिन पोलीस प्रशासनातर्फे भेट देण्यात आली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले व महिलांना पापड मशीन भेट दिली .

यावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, सहाय्यक उपनिरीक्षक राकेश कोल्हे , भाजपयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, राजू सवर्णे, राष्ट्रवादी चे सुनील कोंडे, सचिन पाटील , ग्रा. पं.सदस्य ॲड. आनंद वाघोदे , भैया पाटील , बचत गटाच्या अध्यक्षा पिंकीताई , प्रवीण धुंदले, कांतीलाल गाढे, प्रदीप महाराज पंजाबी ,संकेत पाटील, शालीक सोनवणे,यांसह वडगाव पोलीस पाटील संजय पाटील, दगडू पाटील,मकबूल तडवी यासह वडगाव येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आनंद वाघोदे तर आभार राम वाघोदे यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार