आजचे राशीभविष्य, ( शुक्रवार , १० मार्च २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस भागवाल. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. गायन कलेत प्रगती होईल. घरासाठी काही वस्तू खरेदी कराल.

वृषभ :-

आवडत्या कामात गुंग व्हाल. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. महिलांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. चैनीत दिवस घालवाल.

मिथुन :-

मानसिक चंचलतेला आवर घालावा. ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल. एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म करण्याचा योग येईल. तीर्थ यात्रेसाठी नाव नोंदवाल.

कर्क :-

तुमची समाजप्रियता वाढेल. मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

सिंह :-

कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. कामात स्थिरता ठेवावी. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. कामाच्या ठिकाणी विश्वास संपादन कराल. काही चांगल्या गोष्टी अनुभवास येतील.

कन्या :-

धार्मिक कामात प्रगती कराल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. काही चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या व्रात्यपणाकडे लक्ष द्यावे. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल.

तूळ :-

अचानक धनलाभ होईल. लॉटरी मधून आर्थिक गरज भागेल. काही गोष्टी सहज घडून येतील. दिवस काहीसा आळसात घालवाल. फार हुरळून जाऊ नका.

वृश्चिक :-

उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस मौज-मजेत जाईल. भागीदारीतून चांगला नफा मिळेल. तुमच्या संपर्क कक्षा रुंदावतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

धनू :-

कामात काही क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामगारांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. दिवस समाधानात जाईल. आरोग्यात सुधारणा होईल.

मकर :-

बुद्धीचा सदुपयोग कराल. शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील. प्रेमसौख्याला बहर येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. जुगारात चांगला धनलाभ संभवतो.

कुंभ :-

शांत झोपेचा अनुभव घ्याल. घराची छान सजावट कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. दिवस सुख-शांतीत जाईल.

मीन :-

प्रवासाची आवड पूर्ण कराल. वैचारिक दृष्टीकोन सुधारेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य लाभेल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार