जळगाव : सध्या महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील एका धक्कादायक घटना समोर आली आहे.तु माझ्याशी अनैतिक संबंध ठेव, नाही तर तुला कामावर ठेवणार नाही असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत सुपरवायझरने ३१ वर्षीय सुरक्षारक्षक महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ८ वाजता एका हॉस्पिटलमध्ये घडला. याप्रकरणी गुरूवारी रात्री महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉस्पिटलमध्ये पीडित महिला ही सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. हॉस्पिटलमधील सुपरवारयझरकडे सुरक्षारक्षकांच्या ड्युटी लावण्याचे काम सोपविण्यात आले आहे. मात्र, सुपरवायझर हा पीडित महिलेला तु माझ्याशी अनैतिक संबंध ठेव नाही तर इतर सुरक्षारक्षक महिलांना माझ्याची संबंध ठेवण्यास सांग नाही तर तुला कामावर ठेवणार नाही असे बोलून मानिसक त्रास देवून वाईट नजरेने बघायचा. बुधवारी सकाळी ८ वाजता पीडित महिला ही सकाळी ८ वाजता हॉस्पिटलमध्ये कामावर आल्यावर तिला सुपरवायझरने थंब मशिनमध्ये थंब करू न देता तेथून हाकलून लावले आणि शिवीगाळ केली. हा प्रकार शुक्रवारी महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येवून पोलिसांना सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा महिलेच्या फिर्यादीवरून सुपरवायझरविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






