कुटुंबावर काळाचा घाला; नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Spread the love

नाशिक :- नाशिकमधून भीषण अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या (Nashik) इगतपुरीजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या पंढरपूरवाडी येथे अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृतांमध्ये २ पुरुषांसह १ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

अपघात कसा झाला ?

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या पंढरपूरवाडी अपघाताची घटना घडली आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबांतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात २ पुरुषांसह १ महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.

भरधाव कारचे पुढील टायर फुटल्याने कार पलीकडील लेनवरून जाणाऱ्या क्रेनवर जावून आदळल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

अतिवेगाने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; उड्डाणपुलावरुन पडून मृत्यू

वर्धा सेवाग्रामकडून वर्ध्याकडे अतिवेगात असलेली दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. यात दुचाकीवरील (Wardha News) तरुण पुलाखाली पडल्‍याने त्‍याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक उराडे (वय ३१) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी (Accident News) अपघातस्थळी जात पंचनामा करुन नोंद घेतली.

वर्धा येथील आदिवासी कॉलनीतील रहिवासी प्रतिक उराडे हा त्याच्या दुचाकीने सेवाग्राम येथे कामानिमित्त गेला होता. काम आटोपून तो दुचाकीने परत येत असतानाच सेवाग्राम उड्डाणपुलावर वेगात असलेल्या दुचाकीवरुन त्याचे नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी थेट पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. जोरदार धडकेत प्रतिक पुलाखाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार