जागतिक महिला दिनी स्त्री पर्यावरण दूतांचा नगरपालिकेतर्फे पैठणी देवून सन्मान

Spread the love

एरंडोल :- नगर परिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत स्मार्ट गृहिणी स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेचा कालावधी माहे 20 डीसें २०२२ ते 20 जाने २०२३ होता.सदर कालावधी मधे दैनंदिन घनकचरा ओला व सुका असे वर्गीकरण करून देणाऱ्या नागरीकांना घंटागाडी व नपा कर्मचारी मार्फत कुपन देण्यात आले होते.त्यामधे शहरातील एकूण २१०० महीलांनी सहभाग घेतला होता.सहभागी महीलांपैकी १५४७ महिलांनी स्पर्धेचे निकष पूर्ण केले असल्याने त्यांना लकी ड्रा सोडत करीता पात्र करण्यात आले होते.

सदर सोडतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. गितांजली ठाकूर चेयरमन सुखकर्ता फ़ाऊंडेशन यांनी भुषविले. प्रमुख पाहूणे किशोरजी काळकर व माजी न पा पदाधिकारी होते. तसेच व्याख्याते व किर्तनकार अविनाश भारती यांच्या व्याख्यानाने कार्यक्रमाला रंगत आणली.अध्यक्षिय भाषनातून डॉ.ठाकूर मॅडम यांनी महिलांना आत्मविश्वास देवून जागृत केले.शहरातील 10 प्रभागात एकूण 32 पैठणीची लकी ड्रा सोडत वार्ड निहाय काढण्यात आली. त्यानुसार भाग्यवान विजेत्यांना मंचावर उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते येवला येथील प्रसिध्द पैठणीचे वाटप करण्यात आले.

ज्या महीलांनी एकूण 30 दिवासांपैकी 30 कुपन जमा केले. अशा 300 महीलांमधून आकांक्षा महाजन जहागिरपुरा ,रत्नाबाई पाटील गुर्जरगल्ली, नंदिनी पाटील पाताळ नगरी या 3 महीलांची स्मार्ट ग्रृहीणी एरंडोल म्हणून निवड करण्यात आली तसेच पैठणी विजेत्या सर्व भाग्यवान विजेत्यांना पर्यावरणदूत म्हणून गौरविण्यात आले. सोडत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अजित भट व हितेश जोगी यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले.

प्रस्तावनेत शासनाच्या स्वच्छतेच्या धोरणाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचा परिचय विकास पंचबुधे यांनी करून दिला. तसेच उपस्थितांचे आभार विवेक कोळी यांनी मानले. कार्यक्रमांचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमास एरंडोल शहरातील पदाधिकारी, पत्रकार बांधव, व्यापारी वर्ग, असंख्य महिला , तसेच नगर पालिकेतील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

हे देखील वाचा

टीम झुंजार