जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
जवळच्या प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था जाणवू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.
वृषभ :-
तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.
मिथुन :-
मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.
कर्क :-
भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्यांचा सल्ला घ्यावा.
सिंह :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
कन्या :-
जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.
तूळ :-
घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड येऊ शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.
वृश्चिक :-
साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.
धनू :-
कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊन देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.
मकर :-
प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ-पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.
कुंभ :-
हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
मीन :-
श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






