पारोळाच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये औषधांचा तुटवडा ;नागरिक हैराण.

Spread the love


पारोळा :-येथील कुटीर रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.सर्वाधिक रुग्ण हे सर्दी खोकल्याचे असतांना सर्दीच्या गोळ्या आणि खोकल्याची बाटली मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

कुटीर रुग्णालयात नियमित २५० ते ३०० सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येत असतात खासगी दवाखान्याच्या खर्च परवडणारा नसल्याने गोरगरीब सर्वसामान्य नागरिक कुटीर रुग्णालयात धाव घेतात मात्र कुटीर रुग्णालयातच सर्दीच्या गोळ्या आणि खोकल्याची बाटली यांच्यासह विविध औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना हताश होऊन परतावे लागत आहे.

कोरोना आणि ओमीक्रोन यांच्या भीतीने सर्दी खोकला झाल्यास तातडीने नागरिक दवाखान्यात धाव घेतात परिणामी सर्वाधिक रुग्ण हे सर्दी खोकल्याचा उपचारासाठी येत असल्याचे डाँ.नइम बेग यांनी सांगितले.दरम्यान औषधांचा तुटवडा बाबत मागणी केली असल्याचे कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाँ.योगेश साळुंखे यांनी सांगितले.

टीम झुंजार