एरंडोल- येथील परदेशी गल्लीतील वीस वर्षीय युवकाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याबाबत माहिती अशी,कि परदेशी गल्लीतील रहिवासी राहुल संजय पाटील (वय-२०) याने आज दुपारी राहत्या घरातील लोखंडी angalला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.राहुल याने आत्महत्या केली त्यावेळी त्याची आई व बहिणी शेतात कामासाठी गेले होते.
दुपारी तीन वाजता राहुल याची मावशी व बहिण घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.घरात गेल्यानंतर राहुल हा गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे त्यांनी त्याचे मावशे जितेंद्र युवराज पाटील याना कळवले.जितेंद्र पाटील त्वरित घरी आले आणि सिद्धार्थ परदेशी,अमरीश परदेशी यांच्या मदतीने राहुल यास खाली उतरवले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले.ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी व डॉ.रोहित पुराणिक यांनी त्यास तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.

याबाबत जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार अनिल पाटील तपास करीत आहेत.राहुल पाटील यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असून आई,वडील,बहिण शेतात मजुरीचे कामे करून आपला चरितार्थ चालवत होते.राहुलच्या पच्छात आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे.दरम्यान राहुलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.रात्री उशिरा राहुलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






