Side effects of drinking water while standing उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरावर होतील गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी सांगितले तोटे..
पाणी पिण्याचे फायदे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पाणी पिताना काही लोकं उभे राहून पितात, तर काही बसून. आपल्याला अनेकदा पाणी पिताना उभं राहून पिऊ नकोस असा सल्ला मिळतो. उन्हाळ्यात बाहेरून घरात आल्यानंतर खूप तहान लागते. आपण तसच उभं राहून पाणी पितो. पण ही पाणी पिण्याची पद्धत चुकीची आहे. उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात, मग ते ऑफीस असो किंवा घर. पण ही सवय वेळीच मोडायला हवी.
यासंदर्भात, नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटल प्रिवेंटिव हेल्थ डिपार्टमेंटमधील संचालिका डॉ. सोनिया रावत म्हणतात, ”उभे राहून किंवा पडून राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी लोकांनी बसून पाणी प्यावे. उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील खनिजे पचनसंस्थेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते.”
शरीरात उद्भवू शकतील गंभीर समस्या

डॉ.सोनिया रावत सांगतात, ”उभं राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरचे नुकसान होते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. किडनी शरीरात फिल्टरसारखे काम करते, त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडू शकते. उभं राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुस आणि हृदयाचे नुकसान होते. यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. यासह मज्जासंस्थेवरही परिणाम होतो.”
पाणी कसे प्यावे?

डॉ.सोनिया रावत यांच्या मते, ”पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावे. पाण्याचे छोटे घोट घेत प्यावे. पाणी हळू हळू प्यायल्याने शरीराला फायदा होतो. असे केल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते, यासह शरीराला आवश्यक खनिजे मिळतात. एका दिवसात २ ते ३ लिटर आवश्यक पाणी प्यावे. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते व सर्व अवयव निरोगी ठेवते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






