:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी 246 वाहनांमधून 45 हजार 651 गोण्या कांदा विक्रीसाठी आला.
जास्तीत जास्त भाव 3800 रुपयांपर्यंत निघाला.उन्हाळी कांद्याच्या मोठ्या मालाला 3500 ते 3600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मध्यम मालाला 3100 ते 3200 रुपये, गोल्टी मालाला 1900 ते 2100 रुपये,
गोल्टा कांद्याला 2000 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जोड कांद्याची 500ते600 रुपये क्विंटल दराने विक्री झाली. उन्हाळ कांद्याच्या एक-दोन वक्कलांना 3600 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.