अमरोहा:- लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. लग्नाच्या दिवशी प्रत्येक कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण असतं. थाटामाटात आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल, अशी आस घरातील लोकांना असते.मात्र, लग्नाच्या दिवशीच एका कुटुंबावर दुःखाचा भलामोठा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
एका शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलीचा लग्नाच्या दिवशीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेशातील अमरोहा गावातील हसनपूर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. कविता (वय 20 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
लग्नाच्या दिवशीच नवरीचा (Birde) मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील रुस्तमपूर खादर गावात शेतकरी चंदकिरण हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी कविता (20) हिचा विवाह हसनपूर तहसीलमधील रहिवासी मिंटू सैनी याच्याशी होणार होता. मात्र, लग्नाच्या (Marraige) आधीच कविता तापाने फणफणली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कवितावर गेल्या ५ दिवसांपासून मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

येत्या १५ मार्च रोजी तिचा विवाह होणार होता.इकडे लग्नाची तारीख जवळ येत होती. दुसरीकडे, कविताच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दुर्देवी बाब म्हणजे विवाहाआधीच तिला मृत्युने कवटाळलं. तापामुळे लग्नाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने दोन्ही कुटुंबातील लग्नाचा आनंद दुःखात बदलला.
दरम्यान, कविताची प्रकृती अधिकच बिघडल्याने डॉक्टरांनी कविताच्या जगण्याची आशा नसल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर ज्या दिवशी कविताचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही बाब कविताच्या नातेवाईकांना समजताच घरात शोककळा पसरली.

हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






