भडगाव :- येथे पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 21/01/2023 रोजी गु.र.नंबर 18/2023 नुसार महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, सन 2022 मध्ये तक्रारदार महिलेची भडगाव येथील सागर वैद्य या इसमा सोबत फेसबुक वरून ओळख झाली होती. त्यामुळे सदर महिला व आरोपीचे प्रेम संबंध निर्माण होऊन आरोपीने महिलेस “मी तुझ्यासोबत लग्न करणार असून तुला जीवनभर वागवेल” असे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तसेच आरोपीने महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचे फोटो व्हाट्सअप वर मित्रास शेअर केले. त्यानंतर सदर महिला गरोदर असल्याचे तिला लक्षात आल्यावर तिने आरोपीस त्याबाबत विचारले असता आरोपीने महिलेस लग्न करू असे सांगितले. परंतु त्यानंतर सदर महिलेने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही, म्हणून महिलेने आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376, 376(2)(n), 354(c) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66(ई)व 67 प्रमाणे बलात्काराची तक्रार दाखल केलेली होती.

सदर तक्रारीवरून आरोपीस दिनांक 01/02/2023 रोजी अटक केलेली होती. तेव्हापासून आरोपी कोठडीत होता. त्यामुळे आरोपीतर्फे ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी, भडगाव यांनी जळगाव येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून त्यामध्ये “महीलेने दोन विवाह केलेले होते, तिला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी असून तिचे आरोपी सोबत प्रेम संबंध होते,

यावरून महीलेने तिचे संमतीने आरोपी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत, त्यामुळे हा शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार होऊ शकत नाही” असा युक्तिवाद केला होता. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची रक्कम रुपये 25000/- चे जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचा आदेश केला. सदर आदेशानुसार आरोपीची जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपी तर्फे ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी यांनी कामकाज चालविले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






