आजचे राशीभविष्य, ( सोमवार , २० मार्च २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तू खरेदी कराल. झोपेची तक्रार कमी होईल. हातात नवीन अधिकार येतील.

वृषभ :-

कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक गोष्टीत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. तात्विक गोष्टींवर मतभेद संभवतात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

मिथुन :-

कमिशनमधून लाभ मिळेल. नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासायला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको. काही कामे अधिक वेळ घेतील.

कर्क :-

मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.

सिंह :-

पित्त विकार बळावू शकतात. सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल. सौंदर्यप्रसाधनेच्या वस्तू खरेदी कराल. तुमच्यातील चांगल्या गुणांची दखल घेतली जाईल.

कन्या :-

कौटुंबिक सौख्य वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल. मनाची विशालता दाखवाल. उच्च रहाणीमानाची आवड जोपासाल.

तूळ :-

दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालावे. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

वृश्चिक :-

मानसिक चांचल्य जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. मुलांशी मतभेद संभवतात. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील.

धनू :-

व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील. योग्य संधीची वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

मकर :-

उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमचा तर्क अचूक ठरेल. अती चौकसपणा दाखवू नका.

कुंभ :-

कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल. ध्यानधारणे साठी वेळ द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कोर्ट-कचेरीची कामे निघतील.

मीन :-

व्यवसाय वृद्धीकडे मार्गक्रमण करावे. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. धूर्तपणे वागणे ठेवाल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार