सोयगाव, दि.२१.(साईदास पवार)..जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची संपातून माघार होताच मंगळवारी सोयगाव तालुक्यात ९४ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शंभर टक्के शिक्षक कर्मचारी हजर झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांनी दिली असून पहिल्या च दिवशी मंगळवारी तालुक्यातील वीस शाळांना जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत क्रीडा साहित्याचा संच वितरण करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला
जिल्हा परिषद अंतर्गत सोयगाव तालुक्यात राज्यव्यापी संपतील सर्वच सहभागी कर्मचारी मंगळवारी हजर झाल्याने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सर्वच यंत्रणा सुरू झाल्या होत्या दरम्यान संप काळात बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या संपा नंतरच्या पहिल्या च दिवशी सोयगाव तालुक्यात वीस शाळांना जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत क्रीडा साहित्याचा संच वाटप करण्यात आला यावेळी जरंडी केंद्रात मुख्याध्यापक बाळासाहेब सुळ, लक्ष्मण शेकोगार विलास वालदे शिल्पा चौधरी, जांभुळकर सर शालेय समिती अध्यक्ष साईदास पवार आदींची उपस्थिती होती…

संपाची माघार होताच पहिल्या च दिवशी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्वच शाळा मध्ये मंगळवारी विविध उपक्रम राबविण्यात आले…

छायाचित्र ओळ-जरंडी केंद्रात क्रीडा साहित्य वितरण करतांना मुख्याध्यापक बाळासाहेब सुळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईदास पवार व इतर






