नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा.माजी सभापती अमोलदादा पाटील यांनी केली मागणी.
एरंडोल :- राज्यभरात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री मा.ना.अब्दुलजी सत्तार साहेब जळगांव जिल्हा दौऱ्यावर असतांना एरंडोल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.अमोलदादा पाटील यांनी बरेच शेतकरी पंचनाम्यापासुन वंचित आहेत, तसेच गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावुन गेलेला आहे.
हे नुकसान कुठेही एका विशिष्ट भागात नाही तर सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे व्हावेत व तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मा.मंत्री महोदयांकडे केली. या मागणीची मा.मंत्री महोदयांनी दखल घेत, शासन अतितातडीची मदत जाहीर करण्यासाठी सकारात्मक असुन एकही शेतकरी पंचनाम्याशिवाय राहु नये, सर्वांचे सरसकट पंचनामे व्हावेत जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहु नये असे आदेश उपस्थित तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांना दिले.

यावेळी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.अमोलदादा पाटील यांनी मंत्री महोदयांचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा वतीने सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, मा.जि.प.सदस्य प्रतापभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, धुळे जिल्हाप्रमुख सतिषतात्या महाले, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, बबलुदादा पाटील, अमळनेर तालुकाप्रमुख प्रथमेश पवार, शहरसंघटक मयुर महाजन, टोळी येथील बाळासाहेब पाटील, तहसिलदार सुचिता चव्हाण, तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





