शिक्षक जावयाला मारहाण.

Spread the love

पारोळा वार्ताहर


मौजे बाबरे ता.जि.धुळे येथील राहणारे प्राथमिक शिक्षक शंकर भिकन अहिरे यांना पारोळा येथे राहत्या घरी त्यांची पत्नी संगीता अहिरे,सासरे अशोक भोगे,शालक मनोज भोगे,सासू सौ.मालतीबाई भोगे अशांनी लोखंडी पाईप ने मारहाण व शिवीगाळ केली होती, सदर कमी फिर्यादी शिक्षक यांनी पोलिस स्टेशन पारोळा येथे तक्रार केली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.म्हणून संबंधीत शिक्षकाने सदरचा खटला हा पारोळा येथील विधीतज्ञ भुषण एम.माने यांचे मार्फत पारोळा न्यायालयात खासगी स्वरूपात दाखल केलेला होता.


सदर खटल्याकामी मे. न्यायालयामार्फत सखोल चौकशी होऊन आरोपींना दी.२९-०१-२०२२ रोजी पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश श्री. एम.के.पाटील यांनी भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०६ सह कलम ३४ अन्वये दोषी ठरविण्यात आले व यापूर्वी दुसऱ्या प्रकरणात पत्नी संगीता हिने फिर्यादी पती विरुध्द पारोळा न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारान्वये प्रकरण दाखल केले होते.परंतु न्यायालयाने सदरचा खटला देखील रद्द केला होता.


सदर दोन्ही प्रकरणात फिर्यादी शिक्षक पती तर्फे विधीतज्ञ भुषण एम.माने पारोळा यांनी कामकाज पाहिले व विधीतज्ञ पराग शिरसमणे,पारोळा यांनी मदतनीस म्हणून कामकाज पहिले.

टीम झुंजार