पारोळा प्रतिनिधी समाधान मगर

पारोळा शहरातील बाजार पेठे चा कजगांव नाका ते नगरपरिषदे वरून१ नंबर शाळेपर्यंतचा ह्या मुख्य रस्त्याची गेल्या बऱ्याच दिवसापासुन सर्व व्यापारी व नागरीकांनी आमदार मा आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचेकडे मागणी केलेली होती. याची मा आबासाहेबांनी दखल घेत योग्य तो पाठपुरावा करून कजगांव नाका ते नगरपरिषद रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी २४ लक्ष व शेतकी संघ ते नगरपरिषद रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी २४ लक्ष असे हा मुख्य रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी ४८ लक्ष रूपयांची मंजुरी आणली. त्याच अनुषंगाने रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आले. या कामात स्थानिक व्यापारी बांधवांनी सदर रस्त्याचे काम थेट दुकानांच्या हद्दीपासुन झाले पाहिजे अशी मागणी माआबासाहेबांकडे केली.

त्या अनुषंगाने आज पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्ह्याचे बँकेचे संचालक मा अमोलदादापाटील यांनी प्रत्यक्षात दिनांक १८ जानेवारी रोजी कामाची पाहणी करून व्यापारी बांधवांच्या समस्या जाणुन घेतल्या होत्या.
त्यावेळी दिलेल्या ठोस आश्वासनाची वचनपुर्ती आज दिनांक ०६ जानेवारी रोजी मा दादा साहेबांच्या वाढदिवसा निमित्त कजगांवनाका ते पिर दरवाजा व शेतकीसंघ ते श्रीपाताळेश्वर मंदीरप्रवेशव्दार पर्यंत रस्त्याचा दोन्ही बाजुला पेव्हर ब्लाॕक बसविणे या कामाचा भुमीपुजन सोहळा माअमोलदादापाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी व्यापारी बांधवांचा मागणीची एवढी तात्काळ दखल घेतली याचे समाधान व्यक्त करत व्यापारी बांधवांनी माअमोलदादापाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन_सोहळा साजरा करून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते व व्यापारी बांधव उपस्थित होते.