आजचे राशीभविष्य, ( रविवार , २६ मार्च २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

कामातील बदल समजून घ्या. कामाचा व्याप वाढता राहील. मनावर फार ताण घेऊ नका. मानअपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.

वृषभ :-

घराची दुरूस्ती काढाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल. प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.

मिथुन :-

मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. व्यावसायिक अडचणी दूर कराव्यात. सामाजिक कामाकडे ओढ वाढेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

कर्क :-

घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आपली आब राखून राहाल. पथ्य-पाण्याकडे लक्ष द्यावे. मानसिक सौख्य जपावे.

सिंह :-

कामाच्या ठिकाणी व्याप वाढता राहील. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे. मित्रांची मदत वेळेवर मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढेल.

कन्या :-

कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. घरच्या मंडळींचे सौख्य वाढेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.

तूळ :-

एकमेकांच्या बाजू विचारात घ्याव्यात. आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा. राहत्या घराचे प्रश्न उभे राहतील. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात. घाईघाईने कोणतेही काम करू नका.

वृश्चिक :-

तब्येतीत सुधारणा दिसून येईल. दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल. मैत्रीत गैरसमज संभवतात. चांगल्या संगतीत राहावे. जवळचा प्रवास काळजीपूर्वक करा.

धनू :-

कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. इतरांच्या सल्ल्याने नवीन योजना आखाल. घरच्या दुरूस्तीचे काम निघू शकते. मनावर काहीसे दडपण राहील. कामातून समाधान शोधावे.

मकर :-

जोखमीचे व्यवहार सावधानतेने करा. प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील. सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. नवीन आर्थिक योजना आखाल.

कुंभ :-

उष्णतेचे विकार संभवतात. कामाचा आलेख वाढता राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.

मीन :-

सामाजिक कामातून ओळखी वाढतील. स्थावरचे व्यवहार जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा होतील.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार