Video Viral:मुंबई लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर प्रेमी युगुलाचा रोमान्स; नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

Spread the love

Video Viral मुंबई: – मुंबईच्यालोकल ट्रेनमध्ये एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक लोक रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक जोडपे रोमान्समध्ये गुंतले आहे. तर त्यांच्या समोरील सीटवर देखील एक तरुणी तरुणाच्या मांडीवर बसून मोबाईल फोन वापरत आहे. सार्वजनिक ठिकाणी तरूणाईचे अश्लील चाळे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून एक जोडपे प्रवास करत होते. ट्रेनमध्ये इतरही बरेच प्रवासी होते. अशातच एक जोडपे सर्वांसमोर रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तरुण तरुणीला मिठी मारून तिचे सतत चुंबन घेत असल्याचे दिसून येते. तसेच या प्रेमी युगुलाच्या समोरील सीटवर देखील एक जोडपे असल्याचे दिसत आहे.
लोकल ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा रोमान्स

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रोमान्स करत असलेल्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणाऱ्या या जोडप्यावर नेटकरी कारवाईची मागणी करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटर युजरने लिहिले आहे की, “मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक जोडपे सांताक्रुज ते लोअर परळदरम्यान प्रवास करताना रोमान्स करत आहे.”

या व्हायरल व्हिडीओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. मुंबई लोकल ट्रेनचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत लोक या जोडप्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार