ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

Spread the love

Effective Home Remedies to Cure Low Blood Pressure लो बीपीचा त्रास होतो, अशावेळी काय करायचं कळत नाही, त्यावर हा उपाय.

अनेकदा अचानक ब्लड प्रेशर कमी जास्त होत असते. ब्लड प्रेशर कमी झाल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी येणे, हाता – पायांना घाम येणे, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. पण या समस्येकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्तपुरवठा कमी होतो. बीपीची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक असतात.

परंतु, खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे देखील धोकादायक ठरू शकते. कोणत्याही व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० मिमी एचजी असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब ९०/६० एमएम एचजीच्या खाली जातो, तेव्हा कमी रक्तदाब, किंवा वैद्यकीयदृष्ट्या हायपोटेन्शन असे म्हणतात. यासंदर्भात आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक घरगुती सोपा प्रभावी उपाय शेअर केला आहे.

हिमालयीन मीठ – बीपीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपचार

https://www.instagram.com/reel/Cp4RxwkDKLt/?igshid=YmMyMTA2M2Y=

रक्तदाब नियंत्रणात ठेवते

Pic for Google

हिमालयीन रॉक मीठ पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. त्यामुळेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जर एखाद्याचा रक्तदाब अचानक कमी झाला असेल तर, या उपायामुळे त्याला त्वरित आराम मिळेल.

आयुर्वेदात हिमालयीन मिठाचे फायदे

pic for Google

हिमालयीन मिठाला गुलाबी मीठ असेही म्हणतात. हे मीठ चवीला खारट आणि किंचित गोड लागते, प्रभावाने थंड आणि पचनाला हलके असते. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिज आढळतात. जी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सामान्यतः मिठाची चव पित्ताला वाढवते, परंतु हिमालीयन मिठामधील थंड प्रभावामुळे पित्ताचे संतुलन राखण्यास मदत होते.

छातीतील कफ बाहेर काढते

pic for Google

डॉक्टरांच्या मते, हिमालीयन मीठ कफ बाहेर काढून, छातीतील रक्तसंचय दूर करण्यास मदत करते. ज्यामुळे छातीतील समस्येपासून आराम मिळतो.

शरीराला हायड्रेट ठेवते

pic for Google

हिमालयातील मीठाचे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते. यासह शरीराला हायड्रेट ठेवते, तसेच नव्याने खनिजे पुन्हा भरण्यास मदत करते.

घसा खवखवणे आणि खोकल्यासाठी सर्वोत्तम उपाय

Pic for Google

घसादुखीसाठी आपण पाण्यात हळद आणि हिमालयीन मीठ टाकून गुळण्या करू शकता. यात डिकंजेस्टंट गुणधर्म आहेत, जे नाक, खोकला आणि घशाची पोकळी साफ करण्यास मदत करते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार