आजचे राशीभविष्य, ( सोमवार , २७ मार्च २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

कामाचा वेग वाढवावा लागेल. दिवसभर व्यस्त राहाल. घरगुती खरेदीसाठी वेळ काढावा. आवड-निवड प्रदर्शित कराल. प्रवासात महत्त्वाच्या वस्तू सांभाळाव्यात.

वृषभ :-

स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. तरुण वर्गात रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. झोपेची तक्रार जाणवेल.

मिथुन :-

छोट्याश्या सुखाने सुद्धा खुश व्हाल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा सल्ला लाभेल. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका.

कर्क :-

मनातील इच्छा पूर्ण होईल. कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह :-

कलाकारांना अनुकूलता लाभेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कमिशनकडे लक्ष ठेवावे लागेल.

कन्या :-

जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. अनुभवाचा वापर करता येईल. योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

तूळ :-

प्रवास सावधगिरीने करावा. घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीत नवीन योजना विचारात घ्याव्यात. मोठ्या लोकांशी ओळख होईल.

वृश्चिक :-

वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत कराल. कामाला चांगली गती येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.

धनू :-

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. कौटुंबिक प्रश्न निग्रहाने सोडवावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक स्थैर्य जपावे. जवळचे मित्र भेटतील.

मकर :-

दिवसभर कामात गढून जाल. आततायीपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या शब्दाला धार येईल. वेळेचे भान राखावे.

कुंभ :-

नसती काळजी करू नये. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. घर टापटीप ठेवाल.

मीन :-

जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करता येईल. लहान प्रवास कराल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मुलांच्या बाबतीत अधिक लक्ष घालावे. घरगुती कामे उत्तमरीत्या पार पाडाल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार