जळगाव :- दिनांक २६ / ०३ /२०२३ रोजी २१.३० वा. चे सुमारास जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मध्ये पुरुष जातीचे शव मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यावरून जळगाव शहर पो.स्टे. CCTNS NO ७७ /२०२३ भादवि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून त्यातील आरोपी निष्पन्न करून लवकरात लवकर अटक करण्याचे मा.एम. राज कुमार सो., पोलीस अधीक्षक सो जळगाव, यांनी आदेश दिले होते.
त्यावरून मा. एम. राज कुमार सो., पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. श्री. संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग व मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री गणेश चोभे, अमोल देवढे, पोह विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, संदिप पाटील, महेश महाजन, अकरम शेख, संदिप सावळे, पोना संतोष मायकल, विजय पाटील, प्रविण मांडोळे, दर्शन ढाकणे, पोकों ईश्वर पाटील, लोकेश माळी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी केले असता,
घटनास्थळी लोकांकडून तिथे मयताची ओळख पटवली, मयत सोपान गोविदा हटकर, रा. हरीविठ्ठल नगर जळगाव येथील राहणार असल्याने स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील वरील पथका पैकी तिन पथके तयार करून गोलाणी मार्केट तसेच इतर परिसरातून गोपनीय माहितीद्वारे तसेच मयताचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून मयता सोबत त्याचे मित्र ज्ञानेश्वर उर्फ नानु व गोविंद उर्फ चेरी दोन्ही रा. कंजरवाडा जळगाव हे सोबत असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून पथक रवाना होवून पथकाने एकाच वेळी दोन्ही संशयीत आरोपीताचे घरी जावून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली असून त्यांचे सोबत अजून इतर राहुल भट, रा. खोटेनगर जळगाव, करण सकट रा कोड वाडा जळगाव असे सांगीतल्याने इतर दोन्ही आरोपीतांना देखील ताब्यात घेण्यात आले.
वरील चारही आरोपी अनुक्रमे १) ज्ञानेश्वर उर्फ नानू दयाराम लोंढे, रा. कंजरवाडा जळगाव, २) राहुल भरत भट, रा.खोटे नगर जळगाव, ३) गोविंद उर्फ चेरी शांतीलाल झांबरे, रा. कंजरवाडा जळगाव, ४) करण सुभाष सकट रा. कोंडवाडा बी. जे. मार्केट जळगाव अशांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता ज्ञानेश्वर उर्फ नानु याने सांगीतले की, आम्ही चारही मयत सोपान हटकर याची मोटार सायकल घेवून लग्नात गेलो होतो. लग्न लावून आल्यानंतर त्याला त्याची मो.सा. परत देणे करीता गोलाणी मार्केट येथे जावून थांबलो असता
मयत सोपान हटकर हा तिथे दारु पिऊन आला व आम्हास शिवीगाळ करून मारहाण करू लागला त्यावेळी रागाचे भरात राहुल भट याचे जवळ असलेल्या चॉपरने आम्ही त्यास मारले अशी कबुली दिल्याने आरोपी अनुक्रमे १) ज्ञानेश्वर उर्फ नानू दयाराम लोंढे, रा. कंजरवाडा जळगाव, २) राहुल भरत भट, रा. खोटे नगर जळगाव, ३) गोविंद उर्फ चेरी शांतीलाल झांबरे, रा. कंजरवाडा जळगाव, ४) करण सुभाष सकट रा. कोंडवाडा बी. जे. मार्केट जळगाव यांना पुढील तपासाकरीता जळगाव- शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४