Viral Video: महामार्गावर अपघाताचा थरार; भरधाव कारचा टायर फुटला अन्..

Spread the love

Viral Video: जकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही अपघात असे असतात जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारे येतात. रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे.

कारण इथे कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा लोकांची स्वत:ची चुक नसताना दुसऱ्यांच्या चुकीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. सध्या अशाच एका धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

अपघाताचा थरार – हा अपघाताचा व्हिडीओ एका महामार्गावरील असून महामार्गावर भरधाव वेगात चाललेल्या एका वाहनाचा टायर फुटुन शेजारी असलेल्या दुसऱ्या भरधाव गाडीवर जातो आणि पुढे भीषण अपघात होतो. हा टायर प्रचंड वेगात शेजारच्या गाडीखाली आल्यामुळे ती गाडी अक्षरशः उलटी होते. हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तिच्या मोबाईलमध्ये शूट झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडी लांबच्या लांब पलटी होत रस्त्याच्या कडेला उडाली आहे. एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या

व्हिडिओमधील अपघात पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महामार्गावर भरधाव वेगात चाललेल्या एका वाहनाचे टायर गळून पडल्याने शेजारी चाललेल्या एका कारचा अपघात होतो. त्यानंतर कार पलटी होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हा व्हिडीओ Chaudhary Parvez नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी गाडी चालवताना सावधान राहा असा सल्ला दिला आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार