पारोळा l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक लढविण्याची घोषणा माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी यापूर्वी केली आहे. तो धागा पकडून माजी मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्याला मारणी घालण्या पेक्षा ओबीसी मतदारसंघातुन थेट माझ्या विरोधात समोरासमोर निवडणूक लढवावी व त्यांना मी पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. असे खुले आव्हान बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांनी दिले आहे. परिणामी माझी मंत्रीच्या भूमिकाकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक पार्श्वभूमीवर काल ता 26 रोजी रात्री शिवसेना कार्यकर्ते व मतदार मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी आ. चिमणराव पाटील हे होते. कापूस विक्रीचे टोकण डॉ सतीश पाटील यांचे कुटुंबातील सदस्य सह नातेवाईक यांना देखील घेतले आहेत.त्यामुळे त्यांनी त्यावर बोलू नये अशी खोपरखळी अमोल पाटील यांनी यावेळी केली आहे. विकास कामांच्या माध्यमातून मी बाजार समिती सभापती पदला ग्लॅमर निर्माण करून दिले आहे.त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना सुख सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.
आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, माझा राजकीय जीवनाचा हा सुवर्णकाळ सुरू आहे. यापूर्वी आमदार होतो. परंतु सत्तादारी नव्हतो. म्हणून अपेक्षित मतदार संघाचा विकास करता येत नव्हता, करता आला नाही. परंतु आता सत्तादारी आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर होत आहे. सिंचन प्रकल्प चे विषय मार्गी लागले आहेत. शहरासह गावोगावी पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. रस्ते कामे सुरू आहे. सांस्कृतिक सभागृहे उभे राहत आहे. अजून दीड वर्ष सत्ता आहे.

याकाळात अजून भरपूर प्रमाणात निधी आणून विकास करू, परिणामी कृषी उत्पन्न बाजार समिती सह पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका ताब्यात राहिल्या की कुठलीही तांत्रिक अडचण अभावी विकास कामांना ब्रेक लागत नाही.म्हणून या सर्व ठिकाणी सत्ता देण्याचे आहवान त्यांनी या प्रसंगी केले आहे. माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, माजी चेअरमन चतुर पाटील, अरुण पाटील, पोपट नाईक आदींनी विरोधी गटावर आरोप प्रत्यारोप करून चांगलेच तोंडसुख घेत मनोगते व्यक्त केली. तालुका प्रमुख मधुकर पाटील यांनी आभार व्यक्त केले मेळाव्याला मोठी गर्दी होती.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






