पूण्यात पोस्टाचा घोटाळा उघडकीस आला आहे. कमिशनपोटीची रक्कम पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी लाटल्याचे प्रकरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्टाच्या 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : कोण कधी आणि कसे फ्रॉड करेल ते सांगता येत नाही. लोक विश्वासाने पैसे गुंतवतात. मात्र त्यावर काही लोक डल्ला मारतात असा अनुभव येत असतो. तसाच प्रकार पुण्यात घडला आहे. प्रत्येक ठिकाणी होणारी आर्थिक फसवणूक लक्षात घेता लोकांना प्राधान्याने पोस्ट खात्यामध्ये आपले खाते काढून आपला पैसा सुरक्षित आहे असा विश्वास असतो. मात्र आता पुण्यातील एक धक्का प्रकार समोर आला. पोस्टाच्याच अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे. हे पैसे हे नागरिकांनी आरडी आणि विविध योजनेद्वारे पोस्टमध्ये ठेवलेले होते, त्याचाच हा घोटाळा आहे.
विमाननगर येथील बीआरडी 9 शाखा येथे टीडी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची खाती उघडण्यास लावली आणि कमिशन म्हणून सुमारे 5 लाख रुपये उप-डाकपाल आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी वाटून घेतले. तर विमाननगर येथील उप-डाकघरात उप-डाकपालाने टीडी खात्याची गुंतवणूक आणि सुकन्या समृद्धी योजनेतील सुमारे 45 हजार रुपये आर्थिक गैरव्यवहार करून लाटल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंद झाला आहे.

वीर यांच्या तक्रारीनुसार, आरोपी माळी आणि भोसले हे उप-डाकपाल म्हणून कार्यरत असताना 9 बीआरडी डंकर्क लाईनमध्ये असलेल्या 59 टीडी गुंतवणूकदारांची एकूण 2 कोटी 4 लाख 60 हजार रुपये इतक्या रक्कमेचे टीडी खाते उघडायला लावले. कमिशनपोटी 4 लाख 95 हजारच्यावर पैशांपेकी वीर याने तब्बल 75 टक्के रक्कम स्वतः घेतली. त्याचबरोबर 25 टक्के रक्कम दुसरे आरोपी भोसले यांच्याबरोबर वाटून घेतली. खातेधारकांना विश्वासात घेऊन खोट्या सह्या केल्या. अशाप्रकारे टपाल विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2014 ते 2018 या काळात घडली आहे. त्याची माहिती पोलिसांनी आज दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश नानासाहेब वीर (वय- 42) बाळलक्ष्मी निवास खडकमाळ, स्वारगेट पुणे यांनी आपली फसवणूक केल्याबद्दल आरोपी उप-डाकपाल ज्योतीराम फुलचंद माळी (वय -40) आणि रमेश गुलाब भोसले यांची तक्रार करण्यात आली. पोस्ट खात्याच्या विमान नगर परिसरातील दुसऱ्या प्रकरणात विमान नगर उप-डाकघरात आरोपी विलास एच देठे हा 10 एप्रिल 2014 ते 14 सप्टेंबर 2018 उप-डाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने आवृत्ती ठेव खात्यात तसेच इतर योजनांमध्ये पैसे गुंतवले तसेच त्याची नोंद करण्याची जबाबदारी विश्वासाने यांच्याकडे दिली. आरोपी देठे याने 19 खातेदारानी टीडी आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत विविध तारखांना जमा केलेल्या रकमा एकूण 45 हजार 900 रुपये सरकारी हिशोबात जमा न करता आर्थिक गैरव्यवहार केला. या प्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा विमानतळ पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. यातील आरोपी अधिकाऱ्यांना मात्र पुणे पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






