धरणगाव ( पाळधी ) : – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत तीन कारचे नुकसान झाले तर एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथून मार्गस्थ झालेली एक दिंडी पाळधी गावातील एका धार्मिक स्थळाजवळून जात असताना अचानक दिंडीवर दगडफेक सुरु झाली. त्यामुळे दिंडीतील भाविक सैरभर झाले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावातील अन्य काही जणांनीही दगडफेक सुरु केली. त्यात एक जण जखमी झाला. हल्लेखोरांनी काही दुकानांचीही तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवत शांतता प्रस्थापित केली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांचा अतिरिक्त फाैजफाटा दाखल झाला होता.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






