जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
अती श्रमाचा थकवा जाणवेल. खोट्याचा आधार घेऊ नका. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवा. आपल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. नवीन कामांना गती येईल.
वृषभ :-
सामाजिक कार्यात मदत नोंदवाल. दिवस घरी गडबडीत जाईल. घरगुती कामासाठी प्रवास कराल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. कष्टाला पर्याय नाही.
मिथुन :-
गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. पत्नीची प्रेमळ साथ लाभेल. क्षणिक सौख्याने खुश व्हाल. सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.
कर्क :-
अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक चंचलता जाणवेल. मनात नवीन इच्छा जागृत होईल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. लेखन कार्य चांगल्या प्रकारे करता येईल.
सिंह :-
कामानिमित्त प्रवास घडेल. सहकार्यांवर तुमचा दबदबा राहील. मान सन्मानास पात्र व्हाल. कलेला भरभरून दाद मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
कन्या :-
क्षुल्लक गोष्टींचा ताण घेऊ नका. आपले मानसिक स्वास्थ्य आपणच जपावे. कामात द्विधावस्था आड आणू नये. जोडीदाराचे मत विचारात घ्या. परोपकाराची जाणीव ठेवावी.
तूळ :-
जुगारातून फायदा संभवतो. लॉटरीचे तिकीट काढाल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
वृश्चिक :-
घरगुती वातावरण प्रसन्न असेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कामाचा व्याप वाढता राहील. नवीन व्यावसायिक योजना अमलात आणाव्यात. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
धनू :-
ताण मुक्तीसाठी ध्यानधारणा करावी. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मुलांचे भरभरून कौतुक कराल. कामातून उत्तम समाधान लाभेल.
मकर :-
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल. योग्य अंदाज बांधता येईल. सर्व गोष्टी चौकसपणे विचारात घ्याल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल.
कुंभ :-
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. आपले मत उत्तम रित्या मांडाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने नवीन कामे हाती घ्याल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
मीन :-
नवीन गोष्टींमध्ये उत्सुकतेने रस घ्याल. कामात तत्परता दिसून येईल. कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल. हातून एखादे सत्कार्य घडून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






