एरंडोल-येथील म्हसावद रस्त्यावरील पद्मालय फाट्याजवळ असलेल्या निखिल पेट्रोलियम पंपावरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सत्तर हजार रुपये किमतीच्या पेट्रोल व डिझेलची चोरी केली.पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करणारे दोन अज्ञात व्यक्ती कैद झाल्या असून त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
याबाबत माहिती अशी कि म्हसावद रस्त्यावरील निखिल पेट्रोल पंपावर काल (ता.२७) पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पेट्रोल स्टोरेज (tank ) टॅकवरअसलेले सेन्सरचे कनेक्शन तोडून १४ हजार ५७२ रुपये किमतीचे १३७ लिटर पेट्रोल व ५५ हजार ६४१ रुपये किमतीचे ५९९ लिटर चोरोन नेले.पंपाचे व्यवस्थापक सलमानखान शौकतखान पठाण हे सकाळी नऊ वाजता कामावर आले असता त्यांनी पेट्रोल व डिझेलचा (stok) स्टॉक चेक केला असता

त्यांना विक्री झालेल्या मालापेक्षा शिल्लक साठा कमी आढळून आला.त्यांना स्टोरेज (tank)टॅकवर लावलेले सेन्सरचे कनेक्शन तोडून बाहेर फेकलेले आढळून आले.त्यांनी डीप रॉड टाकून stokची तपासणी केली असता पेट्रोल व डिझेलची चोरी झाल्याचे दिसून आले.याबाबत सलमानखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन अज्ञात व्यक्ती सेन्सर कनेक्शन तोडत असल्याचे दिसत आहेत.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






