जरंडीला श्रीराम जन्मोत्सव निमित्त अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह

Spread the love

जरंडी, ता.३०.(साईदास पवार)..जरंडी ता सोयगाव येथे सालाबादप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने गुरुवारपासून (दि.३०) ते दि.६ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ह भ प गणेश महाराज बिलवाडी हे कथन करणार असून श्रीराम जन्मोत्सव चे गुरुवारी ह भ प अमोल महाराज पाटील यांचे तर रात्री ह भ प समाधान महाराज बसंत रेलगाव यांचे कीर्तन होणार असून

शुक्रवारी (दि.३१) ह भ प मुकुंद महाराज विधाते शनिवारी दि.०१ ह भ प अतुल महाराज धुळे रविवारी दि २ प्रकाश महाराज जाधव शिंदखेडा धुळे सोमवारी (दि ३) विश्वनाथ महाराज कोल्हे दिंडोरी नाशिक मंगळवारी दि ४ वेदांताचार्य १००८ वासुदेवानंद} सरस्वती नांदुरा बुलढाणा बुधवारी दि ५ ह भ प मच्छीन्द्र महाराज वाडी भोकर तर गुरुवारी दि ६ हनुमान जन्मोत्सव निमित्त ह भ प मच्छीन्द्र महाराज वाडी भोकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे बालाजी मंदिर संस्थान जरंडी येथील या हरीनाम कीर्तन सप्ताह साठी

प्रेरणा स्थान प पू ह भ प रामकृष्ण नाईक दादा गुरुजी सोयगाव ह भ प भागवत महाराज गाडेकर अध्यक्ष महामुनी अगस्ती महाराज संस्थान सोयगाव दैनंदिन कार्यक्रम मध्ये पहाटे पाच ते सहा काकडा आरती सकाळी सात ते आठ विष्णुसहश्र नाम सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण आणि रात्री नऊ वाजता हरी कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहे यासाठी समस्थ ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे श्री बालासाहेब संस्थान जरंडी व बालाजी भजनी मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे…

हे देखील वाचा

टीम झुंजार