आपले लग्न होणार नाही भीतीने मुक्ताईनगरमधील प्रेमी युगलाने उचललं टोकाचं पाऊल

Spread the love

मुंक्ताईनगर । आपले लग्न होणार नाही या भीतीने मुक्ताईनगर तालुक्यातील एका प्रेमी युगलाने थेट रेल्वेखाली उडी मारली. मात्र यात दुर्देवी मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे.उमेश मोहन तारू (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की चांगदेव येथील उमेश तारू या तरूणाचे तालुक्यातील कुंड येथील तरूणीशी प्रेम होते. परंतु तरुणीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह दुसरीकडे लाऊन दिला होता.

मात्र, मुलीला सासरचे मंडळी त्रास देत असल्याबाबत मुलीने उमेश याला माहिती दिली.यामुळे उमेश याने त्या तरूणीला ठाण्यावरून पुण्याला नेले. तेथून ते छत्रपती संभाजी नगर मार्गे घरी येण्यासाठी निघाले. तथापि, आपला विवाह होणार नाही असे स्पष्ट होताच उमेश आणि त्याच्या प्रेयसीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. मात्र यात दुर्दैवी उमेशचा मृत्यू झाला. तर त्याची प्रेयसी ही गंभीर जखमी झाली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार