दिल्ली :- आपल्याकडे डासांपासून वाचण्यासाठी अनेक पर्याय केले जातात. यात कॉइल हा एक पर्याय आहे, रात्री अनेकजण कॉइल पेटवून ठेवतात. यामुळे डास येण्याचे प्रमाण कमी होते. पण, याच कॉइलने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना दिल्लीतील शास्त्री पार्क येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
डासांच्या कॉइल आणि गादीला आग लागल्याने पसरलेल्या धुरात कुटुंबातील ६ जण गुदमरले, तर ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात रात्रीच्या वेळी खोलीतील डास दूर करण्यासाठी मार्टिन जाळून झोपलेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या जग प्रवेशचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या मजल्यावरील एक खोली आहे यामध्ये एकूण ९ लोक झोपले होते. मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यावेळी, १५ वर्षीय मुलीसह २ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला. यात मच्छी मार्केट, मजार वाला रोड, शास्त्री पार्कजवळील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सर्व ९ लोकांना रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






