सोयगाव, ता.०१..(साईदास पवार)..मजुरीच्या कामावरून पायी नगर देवळा ता पाचोरा कडे परतत असताना रस्त्यावर मधमाशांनी अचानक रस्त्यावर जोरदार हल्ला चढवून एकास जागेवर ठार केले तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी( ता.३१)सायंकाळी शिंदोल ता सोयगाव शिवारात घडली. या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे…
पाचोरा तालुक्यातील नगर देवळा हे सोयगाव तालुक्याच्या एक किलोमीटरवर आहे या भागातून उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनेक मजूर शेती कामासाठी सोयगाव तालुक्यातील शिंदोल वडगाव किनही आदी भागात येतात पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे सोयगाव तालुक्यात शिंदोल शिवारात मजूरीच्या कामासाठी आले होते काम करुन सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतत असताना शिंदोळ गावाजवळ ते सात वाजता पायी पोहोचले दरम्यान शिंदोल गावाजवळील एका दाट झाडावर नुकतेच अज्ञातांनी डिवचलेले आग्या मोहळ च्या मधमाशा चवताळून उडत असताना,

या मधमाश्यांच्या तडाख्यात रस्त्यावर हे दोघेही बाप लेक सापडले मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढवून सैयद सबदर सैयद इस्माईल (वय ५८) यांच्या तोंडावर डोक्यात आणि हातपाय वर मधमाश्यांनी जोरदार डंख मारून त्यांना जागेवर ठार केले तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही माशांनी डंख मारून गंभीर केले या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.सदर व्यक्ती मजुरी करून आपले उदरनिर्वाह करीत होता

त्याचे पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली असा मोठा परिवार असून आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे..
चौकट—सोयगाव तालुक्यात जंगलात मधमाशा चे पोळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे या मधमाशा च्या पोळ्याना अज्ञातांकडून डिवचले जात आहे त्यामुळे चवताळलेल्या मधमाशा दिसेल त्याला चावा घेतात त्यामुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे…
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






