जळगाव :- येथील दि.२ रोजी भास्कर मार्केट परिसरात खूप मोठा असा हॉस्पिटल एरिया आहे, आणि लांबून लांबून लोक या ठिकाणी आपल्या आजाराची उपचार घेण्यासाठी येत असतात तरी रविवारीच्या दिवशी बऱ्यापैकी जळगाव शहर हे बंद असते आणि अशा वेळेस रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना खाण्यापिण्याची अडचण भासते
त्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अध्यक्ष कुणाल मोरे व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्याकडून दर रविवारी 100 गरजूंना मोफत अन्नदान दिले जाणार आहे. या अन्नदान छत्रालयाचे आज मोठ्या उत्साहात नगरसेवक श्री.अमित काळे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.व माजी नगरसेवक महेश चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कुणाल मोरे, पंकज नाले, हर्षाली पाटील, भारती काळे, चेतन निंबोळकर दिलिप साळुखे,विक्की पाटील ,व नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






