मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एकेकाळी लहान भाऊ आणि मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेले शिवसेना आणि भाजप एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मविआच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, पंतप्रधान आणि भाजप, हिंदुत्वाचे विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “अखंड भारताचे” स्वप्न पूर्ण करा. यासाठी मी त्यांना आव्हान देतो.
छत्रपती संभाजी नगरमधील जातीय हिंसाचारानंतर काही दिवसांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ‘सावरकर गौरव यात्रे’ वरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधताना म्हणाले त्यांच्या हातात पवित्र भगवा शोभत नाही.
सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सश्रम कारावास आणि कष्ट सोसले होते. उद्धव ठाकरे यांनी “तुम्ही सावरकरांचे ‘अखंड भारत’चे स्वप्न पूर्ण कराल का?” असा प्रश्न विचारला आहे. मविआमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदव्यांच्या मुद्द्यावरूनही जोरदार निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सावरकर आणि सरदार पटेल यांच्या आदर्शांवर चालले पाहिजे. काही काळापूर्वी अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजपला उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्यास सांगितले होते. त्यावर,”ही माझी जागा आहे. पण तुम्ही आम्हाला पाकव्याप्त काश्मीर मधील जागा कधी दाखवणार?” ठाकरे यांनी भाजपला सर्वात भ्रष्ट पक्ष म्हटले. याला भारतीय जनता पक्ष म्हणणे हा भारतातील जनतेचा अपमान आहे, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बळजबरीने त्यांच्या पक्षात आणतात. त्यामुळे सर्व भ्रष्ट नेते आता भाजपमध्ये आहेत.
पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पदवीच्या मुद्द्यावरही त्यांनी ताशेरे ओढले आणि म्हणाले की, कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थी देशाचा पंतप्रधान झाल्यास त्यांना अभिमान वाटेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानांच्या पदवीचा तपशील मागवल्याबद्दल उच्च न्यायालयाने २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील माझ्या सरकारमध्ये मंत्री झाले तेव्हा आम्हा दोघांचाही सन्मान मुंबईतील बालमोहन विद्यामंदिराने केला होता कारण त्यांना संस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण वाटत होता. कोणती संस्था पंतप्रधान मोदींचा सन्मान करेल का?
हे देखील वाचा
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.